Thursday, June 24, 2010

Life after Retirement - Episode -3



This has become my customary annual blog. The last blog on This subject was written on 22.06.2009
I am now Thinking " कोण होतास तू , काय झालास तू?"

अर्थात ह्या मराठी गाण्याला एक उपहासाची झालर आहे, मला मात्र उपहास अभिप्रेत नाही.

माझी १३.१०.१९६९ ते २१.०४.२००८ पर्यंत नोकरी झाली. प्रत्येक ठिकाणी मी खाते प्रमुख म्हणजे एक प्रकारचा लीडर होतो. मग गेल्या दोन वर्षात काय झाले. मी acitive वरून passive कसा झालो. त्याचे हे सिंहावलोकन.
निवृत्ती नंतरचे आयष्य कसे असेल ह्याची मी एक यादी बनविली.

1. काहीतरी शिकायचे अणि परीक्षा देऊन पास व्हायचे - हे थोडेफार जमले.
मी इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाचा MBA अभ्यासक्रम घेतला अणि आता तीन सत्रे पूर्ण झाली. म्हणजे आता मला "पदाविउत्तर पदविका " मिळाली. सोप्प्या मराठी मध्ये I now have a postgraduate diploma in Business Management(PGDIBM). अजुन दोन सत्रे पूर्ण करून June 2011 मध्ये माझे MBA पूर्ण होईल.

कुठे तरी शिकवायचे - हे सुद्धा जमले.

मी MBA ला Business Policy and Strategic Managemnt, World Class Manufacturing, Management Control Systems, Current Trends in Management अणि International Business शिकवायला लागलो. दोन वर्षे पूर्ण झाली. मध्यंतरी एक वर्ष योगासने शिकविली.

फिरायला जायचे - हे मात्र थोडेच जमले.
USA - 2007, Eurpoe Tour - 2008, Dubai - 2009, झाली.
राजस्थान, खजुराहो, पुन्हा एकदा काश्मीर, Hongkong, Malesia, Australia वगैरे बाकी आहे.

पौरोहित्य शिकायचे - हे बाकी आहे

Austronomy/ Austrology शिकायची - हे बाकी आहे

Doctorate होणे - हे बाकी आहे
गाणी ऐकायची, गाणी म्हणायची, भरपूर वाचायचे, थोड़े सामाजिक जीवन जगायाचे, - हे सर्व बाकीआहे.
नातवंडे जमा करून त्यांचा लाडका आजोबा बनायचे - हे बाकी आहे.

हे सर्व करायला अजुन दहा वर्षे तरी लागतील. असो. आनंद आहे.

आणखी एक मात्र जमले, रोजची योगासने अणि एक तास चालणे, बेकरी फ़ूड अणि इतर carbo hydrate कमी करून सावकाश रित्या एक वर्षात बारा किलो वजन कमी केले. आता मी ६६ किलो आहे अणि उंची १६६ cm आहे. ह्या वर्षाची ही एक मोठी कमाई

मराठी blog कसा वाटला? खुप छान जमला नाही, तरीसुद्धा एक जम्मातिचा प्रयत्न.

मिशी आबा!